अमरावती - शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणरायाची मिरवणूक ढोल-ताशा आणि गुलालाची उधळण करीत आज (सोमवारी) शहरात निघाली. गणरायाच्या मिरवणुकीमुळे शहर दुमदुमले होते. आजपासून दहा दिवस शहरातील मानाच्या आणि महत्त्वाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी उसळणार आहे.
गणेशोत्सव 2019 : अमरावतीमध्ये ढोल-ताशांच्या निनादात निघाली बाप्पाची मिरवणूक - Amravati Ganpati 2019
शहरातील अंबागेट परिसरातील आझाद हिंद मंडळाची भव्य मिरवणूक शहरवासियांसाठी खास आकर्षण ठरली. ढोल-ताशा, पुरुषांचे लेझीम पथक हे आझाद हिंद मंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. राजकमल चौकात ही मिरवणूक पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या सर्व प्रमुख मंडळाचे देखावे हे दोन दिवसानंतर सुरू होणार आहे.
![गणेशोत्सव 2019 : अमरावतीमध्ये ढोल-ताशांच्या निनादात निघाली बाप्पाची मिरवणूक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4320162-thumbnail-3x2-amravati.jpg)
शहरातील अंबागेट परिसरातील आझाद हिंद मंडळाची भव्य मिरवणूक शहरवासियांसाठी खास आकर्षण ठरली. ढोल-ताशा, पुरुषांचे लेझीम पथक हे आझाद हिंद मंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. राजकमल चौकात ही मिरवणूक पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यासह श्री निळकंठ गणेशोत्सव मंडळ, श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळ, खापर्डे बगीचा परिसरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ आणि रुक्मिणी नगर येथील रुक्मिणी गणेशोत्सव मंडळात 'श्रीं'ची विधीवत स्थापना करण्यात आली.
या सर्व प्रमुख मंडळाचे देखावे हे दोन दिवसानंतर सुरू होणार आहे. तर गौरी पूजनाच्या दिवसापासून सार्वजनिक मंडळातील गणपतीच्या दर्शनासाठी अमरावतीकरांची गर्दी उसळणार आहे. गणरायाच्या मिरवणुकी निमित्त शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.