अमरावती : वरुड तालुक्यातील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील 13 जणांची वर्धा नदी बोट उलटली. यामध्ये दुर्घटनेदिवशीच (14 सप्टेंबर) तीन मृतदेहांचा शोध लागला होता. अन्य 10 मृतदेह शोधन्याचे काम बचाव पथकाकडून सुरू होते. बुधवारी (15 सप्टेंबर) दिवसभरात एकही मृतदेह हाती लागला नव्हता. आज (16 सप्टेंबर) पहाटेपासून पुन्हा बचाव कार्य सुरू झाले. तब्बल 45 तासानंतर आज एकूण 7 मृतदेह हाती लागले. त्यामुळे आतापर्यंत 11 पैकी एकूण 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित एकाचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफ, आरएफआणि एसडीआरएफ व डीडीआरएफ पथक करत आहे.
या अपघातातून बचावले दोघे
वर्धा नदीत 14 सप्टेंबर रोजी पर्यटनास गेलेल्या 13 जणांची बोट उलटली. यातील 11 जण पाण्यात बुडाले. त्यापैकी 10 जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले. घटनेदिवशीच यातील दोघेजण बचावले आहेत. श्याम मनोहर मटरे (वय २५ वर्षे) आणि राजकुमार रामदास उईके (वय ४५ वर्षे) हे दोघे बचावले आहेत. त्यांना पोहायला येत असल्याने ते सुखरुप बाहेर आले.
घटनेच्या दिवशी सापडले तिघांचे मृतदेह
१) नारायण मटरे (वय ४५ वर्षे. रा.गाडेगाव)
२) किरण विजय खंडाळे (वय २८ वर्षे. रा. लोणी)
३) वंशिका प्रदीप शिवनकर (वय २ वर्षे. रा. तिवसाघाट)
आज सापडलेले मृतदेह
१) निशा नारायण मटरे (वय २२ वर्षे)