विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपुरातील रुख्मिणीची पायदळ पालखी पंढरपूरसाठी रवाना - जूनी पालखी
कौडण्यपूरला विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हटले जाते. येथील रुख्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पायी जात असते. रविवारी सायंकाळी 5 वाजता अमरावतीमध्ये पालखी दाखल होणार आहे.
पालखीत भाविकांची गर्दी
अमरावती- जिल्ह्यातील रुख्मिणीचे माहेर कौडण्यपूरला विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हटले जाते. कौडण्यपूर हे ठिकाण तिवसा तालुक्यात आहे. भाविकांची व वारकरी सांप्रदायातील नागरिकांची येथे दररोज गर्दी राहते. येथील रुख्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पायी जात असते.