अमरावती -अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात विविध रंगांची उधळण व्हावी, या उद्देशाने अमरावती शहरातील तरुणांनी नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत होळी साजरी केली. स्वराज्य प्रतिष्ठान, दिशा बहुउद्देशीय संस्था, साद फाऊंडेशन आणि वनमाला बहुद्देशीय संस्थेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नरेंद्र भिवापूरकर शाळेतील अंध विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना रंग लावण्यात आला. रंगाबाबत माहितीही या विद्यार्थ्यांना देण्यात आली. हे चिमुकले विद्यार्थी होळी निमित्त विविध रंगाने माखून निघाले होते. विविध आयोजक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी देखील एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या.