महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंजनगावातील मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी, प्रशासनाचेही दुर्लक्ष

अंजनगाव शहरातील मार्केटमधील दुकाने उघडण्याकरता नगरपालिका प्रशासनाने गेल्या तीन चार दिवसांपासून सूचना दिल्या होत्या. यात एकाच वेळी सर्व दुकाने न उघडता दिवसाआड दुकाने उघडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व सुरळीत चालू होते. परंतु, तिसरे लॉकडाऊन संपताच शहरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

अंजनगावातील मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी
अंजनगावातील मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी

By

Published : May 20, 2020, 3:39 PM IST

अमरावती - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दक्षता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे. परंतु, अंजनगाव शहरात मात्र कुठलेही नियम न पाळता नागरिकांनी मार्केटमध्ये एकच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ही गर्दी पाहता यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे निदर्शनास येत आहे.

अंजनगाव शहरातील मार्केटमधील दुकाने उघडण्याकरता नगरपालिका प्रशासनाने गेल्या तीन चार दिवसांपासून सूचना दिल्या होत्या. यात एकाच वेळी सर्व दुकाने न उघडता दिवसाआड दुकाने उघडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व सुरळीत चालू होते. परंतु, तिसरे लॉकडाऊन संपताच शहरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

चौथ्या लॉकडाऊनमध्ये सर्व आधीचेच नियम कायम राखून दुकाने चालू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी दिले होते. परंतु, अंजनगांवातील मार्केटमधील गर्दी पाहता हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचेही दिसत आहे. कारण, ही गर्दी रोखण्यासाठी शासकीय यंत्रणाही प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details