अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या ग्राम सामाजिक विकास परिवर्तन योजनेअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रायोगिक तत्वावर 1 हजार गावे दत्तक घेण्यात आली होती. यात जिल्ह्यातील धारणी आणि तिवसा तालुक्यातील एकूण 12 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तिवसा तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या शेंदोळा खुर्द या गावाचा समावेश आहे.
तिवसा तालुक्यातील आदर्श गाव शेंदोळा खुर्द
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहलेल्या सामाजिक ग्राम विकास परिवर्तन योजनेत पहिल्या टप्यात जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या आदर्श ग्राम शेंदोळा खुर्दचा समावेश करण्यात आला. खेड्यांचा विकास हे ध्येय समोर ठेऊन सुरू केलेल्या अभियानामुळे शेंदोळा गावाचा कायापालट झाला आहे.
हेही वाचा - अमरावतीच्या तिवसा येथे अतिसाराची लागण; ग्रामीण रुग्णालय हाऊसफुल!
गावात कधीकाळी नळाला दूषित पाणी येत असल्याने येथील नागरिकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं असे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत ने 5 रुपयात 20 लिटर थंड व शुद्ध पाणी देण्याची सोय सुरू केली. सोबतच जे कुटुंब वर्षभराचा पाणी पट्टी व घर कर भरेल त्याला रोज 20 लिटर पाणी व ग्रामपंचायतच्या पिठगिरणीतून मोफत दळण दळून दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न देखील वाढले आहे. तसेच शौचालय, चौकात व घरासमोर कचरा कुंडी,नाल्याचे बांधकाम करण्यात आले. गावात ठिकठिकाणी संदेश देणारे सुविचार, म्हणी लिहिण्यात आल्या आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे.
तिवसा तालुक्यातील आदर्श गाव शेंदोळा खुर्द
तरुणांच्या सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी डिजिटल लायब्ररीही उघडण्यात आली आहे. तसेच अंगणवाडीत देखील विविध उपक्रमात्मक बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत शेंदोळा खुर्द येथे 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून महाराष्ट्रातील 1 हजार गावांपैकी 30 गावे आता या स्पर्धेत आहे.
हेही वाचा - विधानसभेत आमदार रवी राणांचे डिपॉझिट जप्त होणार- नगरसेवक तुषार भारतीय