महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Senate at Columbia University : जयभीम घोषणा घुमली! गरिबीतून शिकलेल्या विकासची कोलंबिया विद्यापीठात सिनेटमध्ये वर्णी

अमरावतीच्या सिद्धार्थ नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या विकास तातड याची कोलंबीया विद्यापीठाच्या ( Columbia University ) विद्यापीठ धोरण आणि नियम कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याच्या नियुक्तीने अमरावतीचे नाव साता समुद्रापार पोहचले आहे. विकासच्या निवडीचा अमरावती शहरातील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Senate at Columbia University
Senate at Columbia University

By

Published : Oct 30, 2022, 12:35 PM IST

अमरावती :इंग्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याची बातमी भारतीयांसाठी गौरवपूर्ण असतांनाच दुसरी सकारात्मक बातमी आहे. अमरावतीच्या सिद्धार्थ नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या विकास तातड याची कोलंबीया विद्यापीठाच्या ( Columbia University ) विद्यापीठ धोरण आणि नियम कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याच्या नियुक्तीने अमरावतीचे नाव साता समुद्रापार पोहचले आहे. विकासच्या निवडीचा अमरावती शहरातील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात घेत आहे शिक्षण :स्थानिक सिद्धार्थनगर येथील रहिवासी विकास श्रीकृष्ण तातड यांची अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. विकासच्या निवडीचा अमरावती शहरातील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून विकास आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच जोरावर अमेरिका येथील कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेला. तेथेसुद्धा त्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. त्यामुळे त्याची कोलंबिया विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

गरिबीतून शिकलेल्या विकासची कोलंबिया विद्यापीठात सिनेटमध्ये वर्णी


कोलंबिया विद्यापीठातील 7 हजार विद्यार्थ्यांचे करणार प्रतिनिधित्व :विकासला या निवडणुकीत चायना, जपान, इंडोनेशिया, इटली, फ्रान्स, कजागीस्तान, कंबोडिया, कोलंबिया, नेपाळ, माझ्या यशात अनेकांचा सहभाग भारत या देशातील विद्यार्थ्यांची प्रामुख्याने मदत झाली आहे. विकासच्या डिपार्टमेंटमधील जवळपास आठ सदस्यांनी या जागेसाठी अर्ज भरला होता आणि त्यातून एक विद्यार्थी निवडण्यात आला. अशा सगळ्या डिपार्टमेंट्स मधला एक विद्यार्थी व बाकी इतर जागांसाठी सदस्य निवडण्यात आले. विकासच्या कॉलेजमध्ये जवळपास ७००० विद्यार्थी आहेत. ज्यामध्ये मास्टर्स, पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरेट आहेत. त्या सर्वांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन प्रत्येकाला दोन मतदान करण्याचा अधिकार होता. ज्यामध्ये एक मतदान त्यांच्या स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये करण्याचा अधिकार त्यांना होता आणि दुसरे मतदान ते इतर विभागातल्या लोकांना देऊ शकत होते. विकासाला या निवडणुकीत अनेक देशातील विद्याथ्र्यांनी सहकार्य करीत निवडून दिले. निवडून आलेल्या सर्व सिनेट मेंबरची पहिली बैठक पार पडली.


जयभीमच्या घोषवाक्याने करून दिली ओळख :या बैठकीत सगळ्याच सिनेट मेंबर्सनी आपली ओळख एकमेकांना करून दिली. अभिमानाने विकासने ओळख करून देताना जयभीमच्या घोषवाक्याने सुरुवात करून आपली ओळख सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना समान संधी व न्याय देण्याचं काम यापुढे माझ्या सिनेटपदाद्वारे करेल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थी सिनेटरने विकासची कोलंबिया विद्यापीठाच्या, विद्यापीठ धोरण आणि नियम कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. विकास तातड याचे वडील श्रीकृष्ण तातड यांचे येथील दयासागर हॉस्पिटलजवळ चहाचे कॅन्टीन आहे. या बैठकीत सगळ्या सिनेट मेंबर्सनी त्यांनी हे कॅन्टीन लावण्यासाठीसुद्धा कर्ज घेतले आपली ओळख एकमेकांना करून दिली. होते. त्यांचा मुलगा विकास टाटा इन्स्टीट्यूट अभिमानाने विकासने ओळख करून देताना ऑफ सायन्स मुंबई येथे शिकला असून त्याने जयभीम च्या घोषवाक्याने सुरुवात करून आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे.


समता बंधुत्वाचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करेल :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय, समता आणि बंधुत्वाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. यासोबतच विद्यापीठाच्या अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन त्यामध्ये आणखी काय चांगलं करता येईल यासाठी प्रयत्नरत राहील असा विश्वास विकास ने व्यक्त केला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोलंबिया विद्यापीठातील सिनेट निवडणूक जिंकता आली. यामध्ये अनेक लोकांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग मला लाभला. येणाऱ्या वर्षांमध्ये अभ्यासासोबत विद्यापीठाच्या अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन त्यामध्ये आणखी काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करेल. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय, समता, आणि बंधुत्वाचा विचार सर्वापर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत करेल. असेही विकास तातड म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details