महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vidya chavhan: सत्तेत राहून हिंदूंना मूर्ख बनवण्याचा काम भाजप करतंय.. विद्या चव्हाण - महागाई व बेरोजगारी विरोधात जनजागरण यात्रा

भगवा सत्तेत बसतो आणि सत्तेत राहून हिंदूंना मूर्ख बनवण्याचा काम भाजप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी भाजपावर करत निशाणा साधला आहे. मोदींनी वायफळ बोलू नये तर जादूटोना करून मुख्यमंत्र्यांनी खुर्ची मिळवली असल्याचा घणाघात आरोप विद्या चव्हाण यांनी केला. महागाई विरोधात जनतेला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीची जागर यात्रा अमरावतीत आली असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

Vidya chavhan
विद्या चव्हाण

By

Published : Mar 4, 2023, 11:27 AM IST

सत्तेत राहून हिंदूंना मूर्ख बनवण्याचा काम भाजप करत आहे

अमरावती: भाजप हिंदूंना मूर्ख बनवत आहे, महागाई कधी कमी होणार यावर मोदींनी बोलावे. आता नरेंद्र मोदी यांनी वायफळ बोलू नये, तर सुरू असलेल्या अधिवेशनात सुद्धा महागाईवर कोणी बोलत नाही. कामख्या देवीचे दर्शन घेऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीची खुर्ची मिळवली, एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन इथल्या महाराष्ट्रातल्या देवीदेवताचा हा अपमान केला आहे, अशी टीका ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी यावेळी केली.


महागाई व बेरोजगारीमुळे नागरिक त्रस्त: राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे राज्यभरात महागाई व बेरोजगारी विरोधात जनजागरण यात्रा सुरू आहे. अमरावतीत जनजागर यात्रा पोहोचली असून यावेळी महागाई व बेरोजगारी कशी वाढली या संदर्भात चित्रफीत दाखवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहरचे आयोजनवर्तमान भाजप सरकारच्या राजवटीत महागाई व बेरोजगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्य माणसाला यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. या महागाई व बेरोजगारीमुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहे.


जनतेची दिशाभूल: महागाई विरोधात जनतेला जागे करण्यासाठी, जागर यात्रा या महागाई व बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-महिला आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जनजागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच शृंखलेत शुक्रवारी उशिरा अमरावती जिल्हामध्ये जनजागर यात्रेची सुरुवात झाली. या जनजागर यात्रामध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष-विद्याताई चव्हाण यांनी वर्तमान सत्ताधीश सरकारचे धोरण हे केवळ मुठभर धनंदांडग्यांचे हित जोपासणारे आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जनतेशी निगडित ज्वलनंत समस्यांचे निराकरण करण्याऐवजी, केंद्र सरकारच्या वतीने जनतेची दिशाभूल करण्याची दररोज मालिका राबविली जात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.



जनजागरण यात्रा : कोट्यवधी युवक रोजगाराच्या संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना केवळ त्यांना आश्वासनाचे गाजर दाखविले जात आहे. पेट्रोल, गॅस दरवाढ लक्षात घेता, वाढत्या महागाईच्या वणव्यात जनजीवन होरपळून जात आहे. उदरनिर्वाह कसा भागावायचा या विवंचनेत सर्वसामान्य माणूस असताना त्यांच्या हितासाठी कोणत्याही प्रकारचे ठोस नियोजन, उपाययोजना, अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार सर्व आघाडीवर सपशेल अपयशी ठरले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता सत्ताधारी केंद्र सरकारचे धोरण म्हणजे सर्वसामान्य माणसाची फसवणूक करणारे आहे. आता जनतेची होणारी फसगत व दिशाभूल रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते-राष्ट्रीय अध्यक्ष-शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची जनजागरण यात्रा आता संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या महागाई विरोधात व बेरोजगारी विरोधात जाणार आहे.सत्ताधीशांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी काढण्यात आली आहे.

सावित्रीच्या लेकींना साथ द्या: जनतेचे न्याय,हक्क,अधिकार अबाधित राखण्यासाठी सावित्रीच्या लेकींनी जागर करीत आता जनतेची अधिक प्रतारणा होणार नाही, याकरिता निर्धार केला आहे. आपण सर्वांनी आम्हा सावित्रीच्या लेकींना साथ देऊन आता जनतेच्या दरबारात या केंद्र सरकारला धडा शिकविण्याकरिता आपणही या जनजागर यात्रेत सहभागी होऊन, जनतेला जीवनावश्यक वस्तू योग्य भावात उपलब्ध व्हाव्यात. तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक बांधव व युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा. याकरिता सक्रिय सहभाग नोंदवावा. असे मी सर्वांना विनंतीपूर्व आवाहन करते. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा-श्रीमती विद्या चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना संबोधून केले.



यासाठी आमचा हा लढा: राजकमल चौक येथे राष्ट्रवादी महिला जनजागरण यात्रेचे अमरावती येथे आगमन झाल्यावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात व सत्ताधीशानी राबविलेल्या केवळ मूठभर उद्योगपतींचे हित जोपासणाऱ्या धोरणांचा खरपुस समाचार घेतला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचे हित जोपासण्याला घेऊन कुठल्याही प्रकारची तडजोड आम्हाला मान्य नाही. तसेच युवक युवतींना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे. तसेच वाढत्या महागाईमुळे आमच्या गृहिणींचे कोलमडले बजेट पूर्वपदावर आणण्यासाठी आमचा हा लढा असून, केंद्र सरकारला याचा जाब विचारीत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईस्तोवर आम्ही सावित्रीच्या लेकी स्वस्थ बसणार नाही. अशी हाक विद्याताई चव्हाण यांनी देताक्षणीच अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार सदैव तत्पर भूमिका वठवीत आपल्या सोबत आहे, असा विश्वासापूर्ण निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे व त्यांच्या सहकारी मंडळींनी यावेळी व्यक्त केला.

उपस्थित संख्या: याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अमरावती शहर ( जिल्हा )-अध्यक्ष- प्रशांत डवरे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,अमरावती शहर अध्यक्ष-ऋतुराज राजेंद्र राऊत ,माजी महापौर ऍड. किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी प्रदेश पदाधिकारी- सुरेखाताई ठाकरे, सक्षणा सलगर, वर्षाताई निकम, सोनाली ठाकूर, कीर्ती कोरडे, माजी नगरसेवक-सपना ठाकूर, मंजुश्री महल्ले, ऍड. छाया मिश्रा, सुषमा बर्वे, प्रतिभा खंडारे, स्नेहल राऊत, प्रियांका इंगळे, कोमल धोटे, ज्योती बावीसकर, वैशाली मेश्राम, प्रशांत महल्ले, दिनेश मेश्राम, लीना डवरे, अशोक हजारे, गजानन बरडे, सुनिल रायटे, संजय बोबडे, दिनेश देशमुख, पप्पूसेठ खत्री, ऍड. सुनील बोळे, प्रमोद सांगोले, प्रा. डॉ. अजय बोन्डे, दीपक कोरपे, जवाहरलाल व्यास, नितीन भेटाळू, मनीष देशमुख, मनोज केवले, लकीसेठ नंदा, शशिकांत चौधरी, जितेंद्रसिंह ठाकूर, किशोर भुयार, किशोर देशमुख, महेंद्र भुतडा, अजय दातेराव, प्रा. डॉ. श्याम सोमवंशी, भोजराज काळे, दिलीप कडू, दत्तात्रय उर्फ अण्णाजी बागल, राजू लुंगे, प्रमोद महल्ले, नईमभाई चुडीवाले, आदीसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:Sushma Andhare नवनीत अक्का बोलती क्यू नही सुषमा अंधारे यांचा जाहीर सभेत सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details