महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Veterinary Hospital : अत्याधुनिक पशु चिकित्सालयाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन; पूरक उद्योग करण्याचे आवाहन - Nitin Gadkari In Amravati

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते राज्यातील पहिल्या अत्याधुनिक पशु चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन गो पालन व्यवसायाला अत्याधुनिक स्वरूप दिले पाहिजे. तरच येत्या काळात विदर्भात देखील दूध क्रांती घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूरक उद्योग करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Nitin Gadkari
नितीन गडकरी

By

Published : Jul 28, 2023, 7:13 PM IST

सभेत बोलताना नितीन गडकरी

अमरावती : आज अमूल आणि मदर डेअरीचे टर्नओव्हर हे एक लाख कोटीच्यावर पोहोचले आहे. यामागे गुजरातमध्ये कृषी आणि अर्थव्यवस्था अतिशय बळकट होणे हे महत्त्वाचे कारण आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होते आहे. विदर्भात मात्र हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. विदर्भातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेती सोबतच शेतीवर आधारित उद्योगांचा जीडीपी हा, देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 20 टक्क्यांवर पोहोचणे गरजेचे आहे. नांदुरा येथे राज्यातील पहिल्या पशु चिकित्सालयाच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते.



विदर्भात दूध क्रांती होणे काळाची गरज: आज कोल्हापुरात 55 लाख लिटर दुधाचे रोज उत्पादन घेतले जाते. सांगलीमध्ये 40 ते 45 लाख लिटर दूध मिळते. पुणे जिल्हा देखील दूध उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र दुर्दैवाने संपूर्ण विदर्भात 25 ते 30 लाख लिटरच्यावर रोज दूध होत नाही. येणाऱ्या काळात विदर्भाची परिस्थिती बदलायला हवी. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन गो पालन व्यवसायाला अत्याधुनिक स्वरूप दिले पाहिजे. तरच येत्या काळात विदर्भात देखील दूध क्रांती घडेल असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.



तंत्रज्ञान वाढवल्यास आर्थिक सुबत्ता: आजचे जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी देखील तांत्रिकदृष्ट्या प्रगत होणे ही काळाची गरज आहे. शेती व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीचा विकास निश्चित होईल. काहीतरी आगळे वेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आणि शेतावर आधारित उद्योगांवर करणे गरजेचे आहे, असे देखील नितीन गडकरी म्हणाले.



देशी गाईच्या बैलांना महत्त्व द्या: आज गाईने कालवडीला जन्म दिला तर शेतकऱ्यांना आनंद होतो. पण यापुढे गाईने चार चार बैलांना जन्म द्यायला हवा. देशी गाईच्या बैलांना महत्त्व देण्याची गरज आहे. 1952 मध्ये ब्राझीलने भारतातील गीर जातीच्या गाई आपल्या देशात नेल्या. तिथे या गाईंवर संशोधन केल्यावर या गाई 60 लिटर दूध द्यायला लागल्या. आपण आता ब्राझील मधील या गाई भारतात आणायला हव्या. आपल्या देशी बैलांसोबत गाईचा संभोग घडून आपल्या इथे त्या गाईंच्या प्रजाती वाढवण्यास प्रयत्न करायला हवेत. आपल्या गाईंनी देखील रोज 60 लिटर दूध द्यायला हवे. असे प्रयत्न सर्व स्तरांवर होणे आवश्यक असल्याचे देखील नितीन गडकरी म्हणाले.



अत्याधुनिक पशुचिकित्सालयाचे उद्घाटन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या नांदुरा येथे गोकुलम गौरक्षण संस्थेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक पशु चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील हे पहिलेच अत्याधुनिक पशु चिकित्सालय आहे. आपल्या संस्कृतीत गाईंवर प्रेम करा असे सांगितले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले पशु चिकित्सालय अतिशय दर्जेदार आहे. भविष्यात आपल्या गाई आजारी पडणार नाही यासाठी महत्त्वाचे प्रयत्न व्हावेत. आपल्या गाई या भरमसाठ दूध देणाऱ्या व्हावात. तसे जर झाले तर कोणीही गाय विकणार नाही असे देखील नितीन गडकरी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Veterinary Hospital : आता गायी-म्हशींचाही निघणार एक्स-रे; अत्याधुनिक पशु चिकित्सालयाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन
  2. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरणी नागपूरच्या विशेष न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला
  3. Terrorist Afsar Pasha : गडकरींना खंडणीची धमकी देणाऱ्या दहशतवाद्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details