महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरुड पोलिसांची जुगार अड्ड्यावर छापा; १३ जुगाऱ्यांवर कारवाई

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीला मोठ्या प्रमाणावर जुगारी हे लाखो रुपयांचा जुगार भरवत असतात.अशातच अमरावतीच्या वरुड तालुक्यातील मुसळखेड येथे सुद्धा १० ते १५ जुगाऱ्यांनी जुगार भरवल्याची गुप्त माहिती ही वरुड पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे छापा टाकत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. एकीकडे लोकांनी एकत्र जमू नये, असा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे. अशातच काल बुधवारी हा जुगार भरवला गेला होता.

varud police arrested thirteen gambler at musalkhed at amravat
varud police arrested thirteen gambler at musalkhed at amravat

By

Published : Aug 20, 2020, 12:09 PM IST

अमरावती - पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी भरवलेल्या जुगार अड्ड्यावर वरुड पोलिसांनी छापा टाकून १३ जुगाऱ्यासह २ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना वरुड तालुक्यातील मुसळखेड येथे घडली. अटक केलेल्या आरोपी मध्ये वरुड पंचायत समितीचा माजी सभापती निलेश मगरडे याचा ही सामावेश आहे.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीला मोठ्या प्रमाणावर जुगारी हे लाखो रुपयांचा जुगार भरवत असतात.अशातच अमरावतीच्या वरुड तालुक्यातील मुसळखेड येथे सुद्धा १० ते १५ जुगाऱ्यांनी जुगार भरवल्याची गुप्त माहिती ही वरुड पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे छापा टाकत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. एकीकडे लोकांनी एकत्र जमू नये, असा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे. अशातच काल बुधवारी हा जुगार भरवला गेला होता.

वरुड पोलिसांनी केलेल्या या कारवाईत २४ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम,व २ लाख ४० हजार किमतीच्या ६ दुचाकी असा एकूण २ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत राकेश मगरदे, सतीश पवार, प्रफुल ठाकरे, धनंजय देशमुख, शैलेश चोबीतकर, नितीन बाळे, विश्वजित काळबांडे, निलेश सालोडे, रणजित चोबीतकर, अनिल सराटकर, मयूर ठाकरे, राजू गायकी, राहुल लोखंडे, या १३ जुगारी वर जुगार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details