अमरावती- मोर्शी-अमरावती महामार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात वरुड पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड काँस्टेबल राजेश वानखेडे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
मोर्शी-अमरावती महामार्गावर दुचाकीच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - वरूडच्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
वरूड येथील पोलीस कर्मचाऱ्याचा अमरावतीहून परतत असताना अपघाती मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
वरूडला कार्यरत असलेले राजेश वानखडे (50) हे आज दुपारी अमरावती येथील मुख्यालयातून कार्यालयीन टपाल घेऊन दुचाकीवरून वरूडला परत जात होते. यादरम्यान, सावरखेड ते लेहगाव दरम्यान त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरखेड पोस्टेचे ठाणेदार केशव ठाकरे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सलीम चव्हाण, मनोज टप्पे, रामेश्वर इंगोले करत आहे.