महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरूडमध्ये वंचितचे घेराव आंदोलन; आंदोलकांना पोलिसांकडून अटक - vanchit Sushil Belle police custody

जिल्ह्यातील वरूड शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये दलित वस्ती सुधारणा अंतर्गत कामे मंजूर केली आहेत. पण, येथील नगरसेवक हे दलित वस्तीतील कामांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या ठिकाणी आपल्या मर्जीतील कामे करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वारंवार निवेदन देऊनसुद्धा प्रश्न निकाली निघत नसल्याने आज वंचितकडून स्थानिक नगरसेवक यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.

vanchit bahujan aghadi protest Warud
नगरसेवक घेराव वंचित वरूड

By

Published : Jun 16, 2021, 9:48 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील वरूड शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये दलित वस्ती सुधारणा अंतर्गत कामे मंजूर केली आहेत. पण, येथील नगरसेवक हे दलित वस्तीतील कामांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या ठिकाणी आपल्या मर्जीतील कामे करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वारंवार निवेदन देऊनसुद्धा प्रश्न निकाली निघत नसल्याने आज वंचितकडून स्थानिक नगरसेवक यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलन चिघळू नये म्हणून वंचितचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

वरूडमध्ये वंचितचे घेराव आंदोलन

हेही वाचा -अमरावतीत संचारबंदीत आणखी सूट, बाजारपेठ 12 तास राहणार खुली

अमरावतीच्या वरूड येथील नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये दलित वस्तीतील विकास कामांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिक झटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या वस्तीचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात आला, परंतु स्थानिक नगरसेवक हे आपल्या मर्जीतील ठिकाणीच कामे करत असल्याचा आरोप या वस्तीतील लोकांनी केला आहे. संतापलेल्या लोकांनी आज या नगरसेवकाला घेराव घालून जाब विचारला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत घेराव घालणाऱ्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा -अमरावती विद्यापीठाच्या कोरोना चाचणी केंद्राने गाठला ३ लाख चाचण्यांचा टप्पा

ABOUT THE AUTHOR

...view details