महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : व्हॅनचालकाने तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेली दुचाकी - tivasa police station

गुरुकुंज मोझरी ते शेंदोळा खुर्द अशी 3 किलोमीटर अंतरापर्यंत व्हॅनचालकाने भरवस्तीतून दुचाकीला भरधाव फरफटत नेले.

amravati
व्हॅनचालकाने तब्बल 3 किलोमीटर दुचाकी ओढत नेली

By

Published : Jun 15, 2021, 7:47 PM IST

अमरावती -अगदी एखाद्या चित्रपटाला साजेल असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरीत घडला. चक्क गुरुकुंज मोझरी ते शेंदोळा खुर्द अशी 3 किलोमीटर अंतरापर्यंत व्हॅनचालकाने भरवस्तीतून दुचाकीला भरधाव फरफटत नेले. त्या व्हॅनचालकाला पकडण्यासाठी अखेर व्हॅनचा पाठलाग करत नागरिकही मिळेल त्या वाहनाने शेंदोळ्यापर्यत गेले व अखेर त्याला पकडून चोप दिला.

व्हॅनचालकाने तब्बल 3 किलोमीटर दुचाकी ओढत नेली

काय आहे प्रकरण?

गुरुकुंजातील गुरुदेवनगर येथील रहिवासी नरेंद्र मोने यांच्या घरी गेल्या काही महिन्यांपूर्वी महेंद्र बसवनाथे (वय ३९) हे भाड्याने राहायला आले आहेत. महेंद्र यांचेकडे असलेली दुचाकी (एमएच २७ एव्ही ८०३९) ही नेहमीप्रमाणे दैनंदिन काम आटपून घरासमोर उभी केली होती.

तेव्हा पांढऱ्या रंगाची चारचाकी ओमनी व्हॅनने (एम.एच.२७-३११९) भरधाव वेगात येऊन घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी समोरील बंफरला ही दुचाकी अडकली. दरम्यान, ओमनी चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे त्याने आपले वाहन न थांबवता त्या दुचाकीला तसेच फरफटत नेले. ही बाब रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी त्यांनी व्हॅनचालक मोहम्मद फेजान यास रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने कुठेही लक्ष न देता त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने दुचाकीसहीत तीन किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले.

व्हॅनचालक न थांबता भरधाव वेगात राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीच्या दिशेने निघाला. यावेळी गावातील अन्य नागरिक व दुचाकी चालक यांनी पाठलाग करून त्यास पकडले व चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तिवसा पोलिसांनी सदर वाहन चालकास ताब्यात घेतले असून, मोटर वाहन अधिनियम १८५ कलमांवये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details