अमरावती -सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आज अमरावतीमध्ये तब्बल 107 वर्षांच्या आजींना कोरोनाची लस देण्यात आली. गयाबाई चवणे असे या 107 वर्षांच्या आजीचे नाव आहे.
तिवसामध्ये तब्बल 107 वर्षांच्या आजींचे लसीकरण - Corona Vaccination Latest News Amravati
सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आज अमरावतीमध्ये तब्बल 107 वर्षांच्या आजींना कोरोनाची लस देण्यात आली. गयाबाई चवणे असे या 107 वर्षांच्या आजीचे नाव आहे.
सर्व स्तरातून आजींचे कौतुक
गयाबाई चवणे या जिल्ह्यातील मोझरी गावतील रहिवासी आहेत. आज त्यांनी आपल्या कुटुंबासह जाऊन तिवसा येथील सरकारी रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. दरम्यान लसीकरण केल्यानंतर या आजींना अर्धातास निग्राणीत ठेवण्यात आले. लसीकरणाचा कोणताही दुष्परिणाम आजींना जाणवला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कसलीही भीती न बाळगता या आजींनी वयाच्या 107 व्या वर्षी कोरोनाची लस घेतल्याने त्यांचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे. दरम्यान आपण आतापर्यंत 2 हजारांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले, मात्र एवढ्या जास्त वयात लसीकरण करून घेणाऱ्या या आजी एकमेव असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.