महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिखलदऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी; अमरावती जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पुन्हा अवकाळी

चिखलदऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली. या सोबतच अमरावती जिल्ह्यातही अनेक ठिकाणा पुन्हा अवकाळी पाऊस पडाला आहे.

Presence of unseasonal rains in Chikhaldara
चिखलदऱ्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी; अमरावती जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पुन्हा अवकाळी पाऊस....

By

Published : May 3, 2021, 11:36 PM IST

अमरावती - विदर्भातील अनेक जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस कोसळत असतानाच आज पुन्हा मेळघाटासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात सायंकाळी अवकाळी पासून कोसळला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या कांदा पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. सोबत संत्र्यासह भाजीपाला पिकांना देखील याचा जबर फटका बसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाचा अंदाज आठ तारखेपर्यंत वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा -फोन टॅपिंग प्रकरण : अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

आज सायंकाळी अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने मेळघाटातील चिखलदऱ्यामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होता. अमरावती जिल्ह्यात तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा कांदा पिकाला बसला आहे. आणखी तीन चार दिवस विदर्भात असाच अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, त्यामुळे बळीराजा पुन्हा हतबल झाला आहे.

हेही वाचा -नाना पटोलेंना कोणीच गांभीर्याने घेत नाही, त्यांचे आयुष्य कोलांडी करण्यात गेले - आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details