अमरावती -शहरात पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस बरसला. पहाटे पाच वाजता पावसाचा जोर काहीसा वाढला होता. रविवारी दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते मात्र, रात्री अचानक पाऊस झाला. पाऊस झाल्याने सोमवारी पहाटे वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
अमरावती जिल्ह्यात शुकरवारपासून वातावरणात बदल झाला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होऊन सूर्य तापत असताना शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला. मेळघाटात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे चिखलदरा परिसरात दोन दिवस हौशी पर्यटकांची गर्दी वाढली. चिखलदरा तालुक्यासह अचलपूर, तिवसा, धरणी या तालुक्यातही अवकाळी पाऊस जोरदार बरसला. सोमवारी पुन्हा अमरावतीसह चांदुर रेल्वे, तिवसा, दर्यापूर, अचलपूर, चंदूरबाजार या तालुक्यात काळे ढग दाटून आले असून पावसाची शक्यत आहे.
पिकांचे नुकसान