अमरावतीएका २७ वर्षीय वासनांध तरुणाने १९ वर्षीय मित्राला दारू पाजून त्याच्यावर ( Unnatural sex with friend crime ) अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दर्यापूर येथील बाभळी परिसरात घडली. तेथे उपस्थित तिसऱ्याने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे ( viral video in Amravati ) छायाचित्रण केले. कळस म्हणजे तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील करण्यात आला. त्या व्हायरल व्हिडीओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी गुन्हा दाखल ( Amravati crime news ) केला. तक्रारीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणाच्या घरी बाभळी येथे २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
Amravati Crime News मद्य पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक - अमरावती गुन्हे न्यूज
अमरावतीत मित्राने मित्रावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला ( Amravati crime viral video ) आहे.
असा आहे संपूर्ण प्रकारपोलिसातील तक्रारीनुसार, अमोल इंगळे (२७) व सनी हिरपूरकर (२२, दोघेही रा. बाभळी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार), ३४ व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सायंकाळी दोघांनाही अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी सनी हिरपूरकर याने तरुणाला घरी बोलावून त्याला दारू पाजली. त्यानंतर आरोपी अमोल इंगळे याने फिर्यादीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सनी हिरपूरकर याने त्या अत्याचाराचे मोबाइलवर व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानेच ते काही मित्रांच्या व्हॉट्सॲपवर शेअर केले. अन् पाहता पाहता शेकडो लोकांकडे तो व्हिडीओ फॉरवर्ड झाला. त्या व्हिडीओची शहरात सर्वत्र चर्चा होत असताना पोलिसांनी घटनेची दखल घेतली. तक्रारदाराला बोलावून घेतले. बलात्काराच्या अनेक घटना होत असताना मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपूर्ण दर्यापुरात होत आहे.
दोन दिवसांची पोलीस कोठडी१९ वर्षीय पीडित तरुणाच्या तक्रारीवरून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करून दोन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. एकाने अत्याचार केला तर दुसऱ्याने त्याचे मोबाइलमध्ये शूटिंग करत ते व्हिडीओ दुसऱ्यांना शेअर केले.अशी माहिती दर्यापूरचे पोलीस निरीक्षक विनायक लंबे यांनी दिली.