अमरावती - विदर्भाचे काश्मिर म्हणून ओळख असलेले अमरावती जिल्ह्यातील पर्यटनस्थळ चिखलदरा ( Vidarbha's Kashmir Chikhaldara ) येथे जगातील चौथ्या क्रमांकाचा तर भारतातील पहिल्या क्रमांकाचा स्कायवॉकची उभारणी होत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या वनविभागाने या स्कायवॉकच्या बांधकामाला ( Skywalk Construction Chikhldara ) स्थगिती दिली होती. या परिसरात वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याचे केंद्र सरकारच्या वन विभागाने म्हटले होते.
अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ), राज्यमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kade ), खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray Chikhaldara Skywalk ) यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. ( Chikhaldara Skywalk ) त्यामुळे विदर्भातील पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पर्यटकांची संख्या आणखी वाढणार कारण...
चिखलदऱ्यातील गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट पर्यंत स्कायवॉक 407 मीटरचा हा प्रकल्प आहे. याचे काम जलदगतीनेही आता सुरू होणार आहे. भारतातील पहिला आणि जगातील चौथा हा गगनभरारी पूल आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्कायवॉकने जोडण्यात येईल. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांच्या एक नवे आकर्षण निर्माण होईल. या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सध्या सिडकोच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढेल. जगात स्विझर्लंड आणि चायना या ठिकाणी स्वित्झर्लंडचा या ठिकाणी स्कायवॉक आहे.