महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काकाचा सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार, दर्यापूर येथील प्रकार - Amravati police news

नराधम काकाने सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे.

uncle-tortured-six-year-old-daughter
काकाचा सहा वर्षीय पुतणी व अत्याचार दर्यापूर येथील प्रकार

By

Published : Jan 2, 2020, 11:22 PM IST

अमरावती - नराधम काकाने सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे.

दीपक (30) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घरात कोणी नसताना संधी साधून दीपक याने स्वतःच्या सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार केला. चिमुकल्या मुलीने आरडाओरड केल्यामुळे शेजाऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. दीपक याला ग्रामस्थांनी चोप देऊन दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडित चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details