अमरावती Deshi Liquor Shop Demolished :अमरावती शहरातील यशोदा नगर ते दासपूर्णकर या जुन्या बायपासवर अनधिकृत देशी दारूचे दुकान थाटण्यात आलं होतं. या दुकानाला अनेक दिवसांपासून विरोध होता. विशेषत: हे दुकान सुरू होऊ नये, यासाठी गेल्या काही दिवसांपासून नागरिक आंदोलन करत होते. असं असताना रविवारी या दुकानाचं उद्घाटन होणार होतं. मात्र, त्याआधिच अमरावती महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं शनिवारी सायंकाळी हे दुकान जमीनदोस्त केलंय.
देशी दारूचे दुकान तोडलं :अतिक्रमणामुळं देशी दारूचे दुकान तोडण्यात आलं असताना या देशी दारूचा परवाना वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील आहे. मात्र, 'हे' दुकान अमरावती येथे हलविण्यात आलं होतं. आनंद जयस्वाल नावाच्या व्यक्तीनं जुन्या महामार्गावर अतिक्रमण करून 'हे' दुकान थाटलं होतं. विशेष म्हणजे या देशी दारूच्या दुकानामागे त्याचं रेस्टॉरंट आणि बारही कार्यरत आहेत. याठिकाणी हे दुकान होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी महिनाभरापासून आंदोलन केलं होतं, मात्र प्रशासनानं नागरिकांच्या विरोधाची योग्य दखल घेतली नव्हती.