महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Umesh Kolhe murder case - उमेश कोल्हे हत्त्या प्रकरण; एनआयएचे पथक पुन्‍हा अमरावतीत - Umesh Kolhe murder case

उमेश कोल्हे हत्त्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. उमेश कोल्‍हे यांच्‍या हत्‍या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी राष्‍ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) पथक पुन्‍हा अमरावतीत दाखल झाले आहे (Umesh Kolhe murder case). दोन सदस्‍यीय पथकाने नागपुरी गेट पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत महत्वपूर्ण चौकशी केली आहे (NIA team again in Amravati). आतापर्यंत उमेश कोल्‍हे हत्‍या प्रकरणी दहा जणांना अटक करण्‍यात आली आहे.

मेश कोल्हे हत्त्या प्रकरण
मेश कोल्हे हत्त्या प्रकरण

By

Published : Sep 5, 2022, 9:26 PM IST

अमरावती -औषध विक्रेते उमेश कोल्‍हे यांच्‍या हत्‍या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी राष्‍ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) पथक पुन्‍हा अमरावतीत दाखल झाले आहे (NIA team again in Amravati). दोन सदस्‍यीय पथकाने नागपुरी गेट पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत महत्वपूर्ण चौकशी केली आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती -नुपूर शर्मा यांच्या समर्थनात मोबाईल स्टेटस ठेवल्याने उमेश उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी घंटी घड्याळ परिसरात हत्त्या करण्यात आली होती (Umesh Kolhe murder case). या प्रकरणात १२ ऑगस्‍टला या हत्‍या प्रकरणातील दहावा आरोपी शेख शकील (२८) रा. इमाम नगर, लालखडी याला एनआयएच्‍या पथकाने अटक केली होती. हत्‍येच्‍या कटात त्‍याचा सक्रिय सहभाग असल्‍याची माहिती एनआयएने दिली होती. त्‍यानंतर आता एनआयएचे पथक अमरावतीत पोहचल्‍याने या प्रकरणाच्‍या चौकशीला गती मिळण्‍याची शक्‍यता आहे. आतापर्यंत उमेश कोल्‍हे हत्‍या प्रकरणी दहा जणांना अटक करण्‍यात आली आहे.


आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत तपास सुरू -उमेश कोल्‍हे यांच्‍या हत्‍येनंतर आरोपींसह काही जणांनी बिर्याणी पार्टी केल्‍याची माहिती अटकेतील आरोपींच्‍या चौकशीतून समोर आली होती. या पार्टीत कोण-कोण सहभागी होते, याची माहिती घेतली जात आहे. या प्रकरणात आंतरराष्‍ट्रीय सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. हत्‍या प्रकरणाचा अत्‍यंत बारकाईने तपास सुरू असून मिळणाऱ्या सर्व महत्वपूर्ण माहितीच्‍या आधारे संबंधितांची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा - वॉशरूमचा बहाणा करून प्रशपत्रिकेचे फोटो काढले, महिला परीक्षार्थीवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details