अमरावती : औरंगजेबचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यानंतर कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. होता. याप्रकरणावरुन राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. दरम्यान अमरावतीत आलेल्या नितेश राणे यांनी राज्यात दंगली होण्यामागे उद्घधव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. उद्धव ठाकरेंना राज्यात दंगली व्हाव्यात हे नेहमीच वाटत असते. मिरजच्या दंगलीमागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत केला आरोप : राज्यात दंगली व्हाव्यात,असे उद्धव ठाकरेंना नेहमीच वाटत आले आहे. 2004 -2010 मध्ये झालेल्या दंगली या उद्धव ठाकरेंनी घडवून आणल्या होत्या. मिरजच्या दंगलीमागे सुद्धा उद्धव ठाकरेच होते. आता सुद्धा राज्यात दंगली घडविण्यामागे उद्धव ठाकरे हेच असून त्यांची नार्को टेस्ट केली तर ते याबाबत स्वतः सांगतील असे आमदार नितेश राणे यांनी अमरावती पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
...त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे ही दुर्दैवी बाब आहे. मात्र त्यांना धमकी देणारा हा अमरावती शहरातला आमचा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आता सांगण्यात येत आहे. पोलिसांनी अद्याप कुठलीही चौकशी केली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांनी आमच्या कार्यकर्त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्या नवाब मलिक यांच्याबाबत आपुलकी आणि प्रेम ते लोक बाळगू शकतात.मग आम्ही आमच्या कार्यकर्त्याची पाठराखण करणे काही गैर नाही, असे देखील आमदार नितेश राणे म्हणाले.
शरद पवारांना मी आलेल्या धमकीच्या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यांना निश्चितच शिक्षा होईल. हे सरकार उद्धव ठाकरेचे नाही आता आमची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी दक्ष आहेत. -नितेश राणे , भाजप आमदार.