अमरावती -रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्गावर तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला. या मृत्यूला सरकारी यंत्रणा जबाबदार असून आम्हाला योग्य न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका युवकाच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा मृ्त्यू; नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास दिला नकार हेही वाचा - अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आर्मीत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा
सागर किसन सोळंके (वय-27) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून तो हिवरा येथील रहिवासी होता. राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे सागर सोळंके याला जीव गमवावा लागला असल्याचे त्याचे नातेवाईकांचे म्हणत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील वासनकार यांनीही सरकारला जबाबदार धरले आहे. मृताच्या पत्नीसह 2 मुलांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी. अन्यथा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे वासनकार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.
मृताच्या अपघाती निधनासाठी जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सुनील वासनकर यांनी केली.
हेही वाचा - पुण्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना विविध ठिकाणाहून अटक, 28 लाखांचे मादक पदार्थ जप्त