अमरावती -2014पासून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवल्याच्या निषेधार्थ अमरावतीत दुचाकींना धक्का मारो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आले.
अमरावतीत इंधन दरवाढीविरोधात धक्का मारो आंदोलन, बहुजन मुक्ती पार्टीचा मोर्चा इर्विन चौकातून निघाला मोर्चा -
इर्विन चौक येथे बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते एकत्र आले. इर्विन चौक येथून कार्यकर्ते आपल्या दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. यावेळी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुचाकी उलट्या करून ठेवण्यात आल्या.
रस्त्यावर चूल पेटवून केला चहा -
बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चूल पेटवून चहा केला. याद्वारे गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला.
उत्पादन शुल्कात केली वाढ -
2014मध्ये भाजपची सत्तेत आले तेव्हा पेट्रोलियम उत्पादन शुल्क 9.44 होते. आज मात्र ते 32.90 पर्यंत वाढले आहे. डिझेलवर 3.53 रुपये असणारे उत्पादन शुल्क 31.80 एवढे वाढविण्यात आले आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलवर राज्य शासनही कर आकारत आहे, असे बहुजम मुक्ती पार्टीचे पदाधिकारी अॅड. सुधीर डोंगरदिवे म्हणाले.