महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्पदंश झालेल्या आईला भेटण्यास आलेल्या मुलाचा अन त्याच्या मित्राचा नदीत बुडून मृत्यू - अमरावती जिल्हा बातमी

मुळचा शंदोळा बुजरुक येथील रहिवासी गंगाधर गजबे हा सर्पदंश झालेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी नागपूरहून आपल्या मुळगावी आला होता. गावातील नदीत पोहताना त्याचा व त्याच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बचाव कार्य करणारे पथक
बचाव कार्य करणारे पथक

By

Published : Sep 14, 2020, 8:38 PM IST

Updated : Sep 14, 2020, 10:05 PM IST

अमरावती -सर्पदंश झालेल्या आपल्या आईच्या भेटीला नागपूरहून गावी आलेल्या मुलाचा व त्याच्या मित्राचा नदीत बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरूक या गावात घडली. गंगाधर लक्षण गजबे, असे त्या मुलाचे नाव असून त्याच्या मित्राचे अद्याप समजू शकले नाही.

बचावकार्य करताना पथक
दोन दिवसांपूर्वी आईला सर्पदंश झाल्याने गंगाधर गजबे हा आपल्या आईला भेटण्यासाठी नागपूरहून आपल्या मूळ गावी शेंदोळा बुजरुक येथे आला होता. यावेळी त्याच्यासहा नागपूर येथील एक मित्रही आला होता. आज हे दोघेही दुपारच्या सुमारास गावानजीक असलेल्या सूर्यगंगा नदीत पोहायला गेले होते.पण, या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने व नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोन्ही मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची महिती मिळताच शोध व बचाव पथक दाखल होऊन त्यांनी दोन्ही मृतदेह हे पाण्याच्या बाहेर काढले आहे. दोन्ही जिवलग मित्राच्या मृत्यूमूळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Sep 14, 2020, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details