अमरावती :मोर्शीपासून अवघ्या 5 कि.मी.अंतरावर असलेल्या तरोडा धानोरा भिवकुंडी या गट ग्रामपंचायत असलेल्या तरोडा धानोरा येथे रात्री काही पुरूष व महीला जंगलु टेकाम वय (६२) रा.तरोडा, मयाराम धुर्वे वय (६७) रा.तरोडा, सिताराम शेषराव परतेती वय (३७) रा.तरोडा, सुंदा मयाराम धुर्वे वय (65) रा. तरोडा, सौ.सिंधु धुर्वे वय (45)रा.तरोडा, सुमेलाल श्यामू कुमरे वय (40) तरोडा, सुखदेव जिवता उईके वय (42)रा.धानोरा यांची अवैध गावठी मोहाची दारू प्याल्याने प्रकृती अचानक अस्वस्थ झाली. त्यांना चक्कर व उलटी होऊ लागल्याने त्यांना मोर्शी उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अस्वस्थ झालेल्यापैकी जंगलु टेकाम, मयाराम धुर्वे वय रा. तरोडा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. इतर अस्वस्थ रूग्णांपैकी सिताराम शेषराव परतेती, सुंदा मयाराम धुर्वे, सिंधु इसम धुर्वे, सुमेलाल शामू कुमरे आणि सुखदेव जीविता उईके यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची दारू सौ.चन्द्रकला जंगलु टेकाम तरोडा हीने पिण्यास दिली व सुंदा मयाराम धुर्वे, मयाराम धुर्वे, सिंधु इसम धुर्वे यांनी ती दारू पिली त्यातूनच त्यांना बाधा झाली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस तपासात मृतक मयाराम धुर्वे यानेच ती दारू आणली होती व सदर दारू पिल्याने प्रकृती बिघडत असल्याचे माहीत असुन सुध्दा चंद्रकला टेकाम हीने ती दारू त्याला पीण्यास दिली यावरून दोन्ही आरोपी विरूध्द गुन्हो नोंदवले आहेत.