मुंबई -देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने देशभरात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. मात्र, ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने गेल्या एका महिन्यात २०० ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या आहेत. यातून ७७५ टँकरद्वारे १२ हजार ६३० मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे.
१२ हजार मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजनची वाहतूक -
महामारीच्या काळात भारतीय रेल्वेद्वारे अत्यावश्यक सेवांचा पुरवठा केला जात आहे. तसेच आता ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे ऑक्सिजनचा पुरवठादेखील राज्याच्या मागणीनुसार केला जात आहे. याकरिता देशभरात एकूण २०० ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात आल्या आहेत. यामधून एकूण १२ हजार ६३० मेट्रीक टन एलएमओची वाहतूक केली आहे. याद्वारे महाराष्ट्रात ५२१ मेट्रीक टन, उत्तर प्रदेशमध्ये ३ हजार १८९ मेट्रीक टन, मध्य प्रदेशमध्ये ५२१ मेट्रीक टन, हरियाणामध्ये १ हजार ५४९ मेट्रीक टन, तेलंगणात ७७२ मेट्रीक टन, राजस्थानात ९८ मेट्रीक टन, कर्नाटकात ६४१ मेट्रीक टन, उत्तराखंडमध्ये ३२० मेट्रीक टन, तामिळनाडूमध्ये ५८४ मेट्रीक टन, आंध्र प्रदेशमध्ये २९२ मेट्रीक टन, पंजाबमध्ये १११ मेट्रीक टन, केरळमध्ये ११८ मेट्रीक टन आणि दिल्लीमध्ये ३ हजार ९१५ मेट्रीक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन पोहोचवण्यात आले आहे.
चक्रीवादळातही धावली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' -