अमरावती - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दर्यापूर-अंजनगाव मतदारसंघात विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना भाजपने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. मात्र, यामुळे भाजप अंतर्गत दोन गटातील गटबाजी उफाळून आली आहे. रमेश बुंदिले आणि तिकीटासाठी इच्छुक असलेल्या अन्य एक दावेदार असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या नगरसेवक सिमा सावळे यांच्या समर्थकांनी एकमेकांसमोर उभे ठाकून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे अंजनगाव सुर्जीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. एकीकडे बुंदिले समर्थक जल्लोष साजरा करीत असताना साळवे समर्थकांमध्ये नैराश्येचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या दोन गटांतील गटबाजी डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेही वाचा -आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण
सुरुवातीपासून शिवसेनेचा गढ असलेल्या दर्यापूर मतदारसंघात गत निवडणुकीत युती नसताना भाजपचे रमेश बुंदिले यांनी विजय मिळविला. आगामी निवडणुकीत पुन्हा भाजप-सेनेची युती झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असेही बोलले जात होते. मात्र, युतीत अखेर हा मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला गेला. अशात विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांचे नाव तिकीटासाठी आघाडीवर असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका सीमा साळवे यांनी दर्यापुरातून निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरु केली होती. त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम, महिला मेळावे, प्रचार माध्यमातून स्वत:चा एक मोठा गट निर्माण केला. त्यामुळे भाजपचे तिकीट दोघांपैकी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती.
हेही वाचा -निष्ठावान कार्यकर्त्याचे नेत्यावरील प्रेम; 10 रुपयांची नाणी साठवून 5 हजार रुपये दिले अर्ज भरायला