महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरण वाद विकोपाला; दोन गट आमने-सामने - भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरण

एका गटाने आजच भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतर करण्यासाठी तहसील कार्यालयात वाहन आणून त्यात सर्व साहित्य भरावे, अशी मागणी केली. तर, विरोधकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आलेले वाहन कार्यालयाच्या परिसरातून बाहेर काढले. वाद निर्माण झाल्याने फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही गटाच्या मंडळींना तहसील कार्यालयाच्या आवारातू बाहेर काढले.

amravati
भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरण वाद विकोपाला

By

Published : Nov 30, 2019, 6:29 PM IST

अमरावती -शहरात स्थित भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे स्थानांतरित करण्याचा आदेश शासनाने 26 नोव्हेंबरला दिला आहे. मात्र, हा आदेश अस्थिर सरकारच्या कार्यकाळात निघाला असून या आदेशाला आम्ही न्यायालयात आव्हान दिले असल्याने हे कार्यालय अमरावतीतून दुसरीकडे जाऊ देणार नाही, असा पवित्रा एका गटाने घेतला आहे. तर, शासन आदेशानुसार हे कार्यालय आजच स्थानांतरित करण्यात यावे, अशी मागणी करणारा दुसरा गट आहे. हे दोन्ही गट आमने-सामने आल्याने आज भातकुली तहसील परिसरात तणाव निर्माण झाला होता.

भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरण वाद विकोपाला

26 नोव्हेंबरला भातकुली तहसील कार्यालय हे अमरावती शहरातून भातकुली या गावात हलवण्याचा अध्यादेश शासनाने काढला होता. भातकुली तहसील कार्यालय शासनाच्या निर्णयानुसार त्वरित भातकुलीला हलविण्यात यावे अशी मागणी आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत राठी आणि भातकुली येथील शिवसैनिकांनी केली आहे. काँग्रेसचे जयंत देशमुख, भाजपचे सोपान गुडदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या काही मंडळींनी भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत असावे, अशी भूमिका घेतली आहे.

हेही वाचा -

युवा स्वाभिमान, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण; काँग्रेससह सेना आक्रमक

यापैकी, एका गटाने आज भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतर करण्यासाठी तहसील कार्यालयात वाहन आणून त्यात सर्व साहित्य भरावे, अशी मागणी केली. तर विरोधकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आलेले वाहन कार्यालयाच्या परिसरातून बाहेर काढले. वाद निर्माण झाल्याने फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही गटाच्या मंडळींना तहसील कार्यालयाच्या आवारातू बाहेर काढले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत तहसीलदार गुणवंत अरखराव यांनी कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला स्थानांतरित करण्याचा विषय दहा वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. आमदार रवी राणा यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. तर, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भातकुली तहसील कार्यालय हे शेकडो ग्रामस्थांच्या सुविधेसाठी अमरावतीत असावे, अशी मागणी लावून धरली होती. भातकुली तालुक्यात येणाऱ्या एकूण 48 गावांपैकी 40 गावातील ग्रामस्थांनी भातकुली तहसील कार्यालय अमरावतीतच असावे, असा ठराव केला आहे. भातकुली आणि लगतच्या आठ गावातील ग्रामस्थांना मात्र भातकुली तहसील कार्यालय हे भातकुलीतच हवे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details