महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या शहानूर धरणाचे दोन दरवाजे उघडले - निमखेड बाजार

जिल्ह्यातील अंजनगाव,सुर्जी तालुक्यात दोन दिवसांपासुन संततधार सूरु असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर, पाण्याची पातळी वाढल्यामुळे शहानूर धरणाचे दोन दरवाजे सायंकाळी ५.३० वाजता पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारादेण्यात आला आहे.

शहानूर धरणाचे दोन दरवाजे उघडले

By

Published : Aug 8, 2019, 11:57 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील अंजनगाव, सुर्जी तालुक्यात दोन दिवसांपासुन संततधार सुरू असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर, पाण्याची पातळी वाढल्यामुळे शहानूर धरणाचे दोन दरवाजे सायंकाळी ५.३० वाजता पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहानूर धरणाचे दोन दरवाजे उघडले

अंजनगाव-अकोट मार्ग पुलाचा वळण मार्ग वाहून गेल्याने सकाळपासून बंद होता. तर, निमखेड बाजार, हिरापूर चिंचोना, खिराडा गावाचा संपर्क तुटला होता. खिराडा येथील अंबामायच्या नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत होते. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details