महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू - accident on amravati nagur highway

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

two farmer died in accident on amravati nagpur highway
अमरावती नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By

Published : Mar 13, 2021, 8:42 AM IST

अमरावती - आज पहाटे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव जवळ ट्रक आणि ट्रक्टरमध्ये भीषण अपघात घडला. यात दोघेजण जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. कैलास हुंडीवाले (40) व हुंडाआप्पा बहीहट (55) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तसेच संजय दिवटे व मुकेश बिरकट असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टरला धडक देणाऱ्या ट्रॅकचालकाने ट्रक घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

घटनास्थळ

शेतात जात असताना अपघात -

या अपघातात मृत्यू झालेले दोघेही शेतकरी असून ते तिवसा तालुक्यातील दिवानखेड येथून जनावरांसाठी चारा आणायला नागपूर दिशेने निघाले होते. मात्र, मागून येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जबर धडक दिल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या भीषण अपघाता दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - 'उद्या'ला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार आज नाकारला

ABOUT THE AUTHOR

...view details