अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 8 वर; दोन मृत महिलांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह - amravati covid 19 death
शहरात दोन मृत महिलांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 8 झाली आहे. या दोन्ही महिला 20 एप्रिलला दगवल्या आहेत.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा संख्या 8 वर; दोन मृत महिलाँच चाचणी अहवाल पॉझिटीव्ह
अमरावती -शहरात दोन मृत महिलांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 8 झाली आहे. या दोन्ही महिला 20 एप्रिलला दगवल्या आहेत. आज कोरोना चाचणी अहवालात ज्या दोन महिला कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आल्या, त्यापैकी एक 70 वर्षीय महिला ही कमेला ग्राऊंड परिसरातील तर दुसरी 60 वर्षीय महिला ही हैदरपुरा परिसरातील रहिवासी आहेत. या दोघींचाही 20 एप्रिलला मृत्यू झाला. यापैकी एकीचा खासगी रुग्णालयात तर दुसऱ्या महिलेचा घरातच मृत्यू झाला आहे.