अमरावती -जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात बोरगाव (धांदे) गावाला लागून असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात दोन मृतदेह आढळून आले आहेत. नरेश हरिदास नैताम (३८) व पंकज आनंदराव दंडागे (२७), अशी मृतकांची नावे असून हे दोघेही बोरगांव (धांदे) येथील रहिवासी आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट -
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह काढण्याचे काम केले. तसेच हे मृतदेह पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात श्ववविछेदनाकरिता रवाना करण्यात आहे. दरमम्यान, हे दोन्ही युवक आदिवासी समाजातील असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा - वर्धा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; नंदोरी परिसरातील घटना