महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती शहराला 2 दिवसाआड तर, अन्य ठिकाणी 8 दिवसांनी मिळते पाणी

गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि यावर्षी कडक उन्हामुळे जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात केवळ 14.44 टक्के पाणी शिल्लक आहे. अमरावतीसह तिवसा, चांदुर रेल्वे आणि मेळघाटात पाण्यासाठी नागिरकांना पायपीट करावी लागत आहे. 19 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात असून अमरावती शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तर इतर भागात 8 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अमरावती शहराला २ दिवसाआड तर, अन्य ठिकाणी 8 दिवसांनी मिळते पाणी

By

Published : May 28, 2019, 12:19 PM IST

Updated : May 28, 2019, 12:34 PM IST

अमरावती- गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि यावर्षी कडक उन्हामुळे जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात केवळ 14.44 टक्के पाणी शिल्लक आहे. अमरावतीसह तिवसा, चांदुर रेल्वे आणि मेळघाटात पाण्यासाठी नागिरकांना पायपीट करावी लागत आहे. 19 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात असून अमरावती शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तर इतर भागात 8 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा विषयी माहिती देताना अधिकारी...

गत वर्षी झालेला अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 14.44 टक्के पाणी पुरवठा असून जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांमध्ये 34.08 आणि लघू प्रकल्पात 6.72 पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा धरणातून अमरावती, बडनेरा शहरासह वरुड, मोर्शी आणि तिवसा जिल्ह्यात पाणी पुरवठा केला जातो.


यावर्षी पाणीसाठा अत्यल्प असल्याने अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. इतर भागात मात्र 8 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील अनेक भागातील विहीर कोरड्या पडल्या असून कुपनलिकांवर पाण्यासाठी गर्दी उसळत आहे. अनेक कुपनलिका या एक-दोन तासात बंद पडतात. अशा कुपनलिकांमध्ये पाणी येताच अर्ध्या रात्रीही पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.


या गावात टँकरेने पाणीपुरवठा -
जिल्ह्यात 19 गावांना आज टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा, धरमडोह, बहादरपूर, मनभंग, आडनदी, सोनापूर, पिपदारी, खिरपाणी आणि खटकली गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे. अमरावती तालुक्यात बोडना, परसोडा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना, चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर जळका जगताप, सालोरा खुर्द, मोर्शी तालुक्यातील लोहगाव, सावरखेड, आसोना आणि वाघोली या गावाची तहान टँकरद्वारे मागविण्यात येत आहे.


चिखलदरा तालुक्यात सक्कर तलाव, काला पाणीतलाव आणि बिर तलावातून जीवन प्राधीकरनाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. सध्या बिर तलाव कोरडा पडला असला तरी सक्कर तलाव आणि कालापाणी तलावातून चिखलदरा शहर आणि तालुक्यात पाणी पुरवठा होत असून जून अखेरपर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती मंडळाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश चारथळ यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.


शहानूर धरणातूत 156 गावे आणि 2 शहरांना पाणी पूरवठा योजनेनंतर्गत पाणी पुरवले जात आहे. पूर्णा मध्यम प्रकल्पातून दर्यापूर, अंजनगाव, भातकुली या तालुक्यातील 105 गावांना पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवण्यात येत असून आज शहानुर धारण आमी पूर्णा मध्यम प्रकल्पात एक महिना पुरेल इतका पाणी साठा असल्याचे सुरेश चारथळ म्हणाले.


पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन फोडून पाणी चोरण्याचा प्रकार तसेच पंप लावून पाणी ओढणे या प्रकारामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असून आशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही मंगळवारपासून धडक मोहीम राबविणार असल्याचेही चारथळ यांनी सांगितले. अप्पर वर्धा धरणातही दोन ते अडीच महिने पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंत्या सोनाली सोनूले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

Last Updated : May 28, 2019, 12:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details