महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 24 कैद्यांना कोरोना

जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 237 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 1 हजार 96 रुग्ण क्रियाशील असून, त्यातील 21 रुग्णांना नागपुरात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत 92 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2 हजार 203 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

twenty four prisoners corona positive in amravati central jai
twenty four prisoners corona positive in amravati central jai

By

Published : Aug 13, 2020, 10:57 AM IST

अमरावती- जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचे शतक झाल्यानंतर बुधवारी बाधितांचे दीड शतक झाले. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला असून 24 कैद्यांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून 149 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे बुधवारी दोन जण दगावले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 237 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 1 हजार 96 रुग्ण क्रियाशील असून, त्यातील 21 रुग्णांना नागपुरात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत 92 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2 हजार 203 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मोथा, नांदगावपेठ, दयासागर रूग्णालय परिसर, रामपुरी कॅम्प, वृंदावन कॉलनी, कृष्णानगर, सरस्वतीनगर, अंबापेठ, केवल कॉलनी रहाटगाव रोड, सिंधी चौक, द्वारकानाथ कॉलनी, नया अकोला, बेलपुरा, अमरनगर, यशोदा नगर, दस्तूर नगर, वडाळी, अचलपूर, सेंट्रल जेल परिसर अमरावती, साईनगर, विलासनगर, विश्वप्रभा कॉलनी, नवी वस्ती बडनेरा, जेवडनगर, महालक्ष्मी नगर, फ्रेजरपूरा, जयस्तंभ चौक, विश्वप्रभा कॉलनी,
समर्थ कॉलनी मोर्शी, स्वप्नश्री कॉलनी, भातकुली, शिरजगाव, खेलदेवफाली ता. चिखलदरा, बनोसा दर्यापूर, शिरखेड, वलगाव, अंजनगाव सुर्जी, करजगाव, पथ्रोट, दर्यापूर, मलकापूर धामोरी, जीवनपूरा अचलपूर, मालखेडा (ता. वरुड), शेंदूरजना घाट वरुड या व अन्य भागातील रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या नवीन 154 रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कोविड रुग्णालया उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात वडाळी येथील 60 वर्षीय महिलेचा तर समर्थ कॉलनी येथील 57 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details