महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी; जीवितहानी नाही - amravati nagpur national highway news

मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

amravati nagpur national highway news
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी; जीवितहानी नाही

By

Published : May 3, 2021, 6:59 PM IST

अमरावती - अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

व्हिडीओ

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही -

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी भारवाडी (हॉटेल आनंद) जवळ अमरावतीकडून नागपूरकडे जात असलेला एम.एच. 12 क्यू.डब्लू 4881 हा मालवाहू ट्रक आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास अनियंत्रित झाल्याने पलटी झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रॅकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ट्रक हा पूर्णपणे रोडवर आडवा झाल्याने वाहतूक काही वेळपर्यंत ठप्प झाली होती. घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक एका बाजूला वळती केली.

हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याकरता लॉकडाऊनचा विचार करा - सर्वोच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details