अमरावती - समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे टिप्पर जागीच जळून खाक झाला आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारासा चांदूर रेल्वे तालुक्यात ही घटना घडली.
अमरावतीत ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श, ट्रक जळून खाक - अमरावती
भर उन्हात स्पर्श झाल्याने टिप्परने थेट पेट घेतला. ट्रक चालकाने आपला जीव वाचवला. मात्र, ट्रक काही मिनीटांतच जळून खाक झाला.
![अमरावतीत ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श, ट्रक जळून खाक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3190717-thumbnail-3x2-truck.jpg)
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड परिसरात समृध्दी महामार्गाचे काम दिवस रात्र सुरू आहे. घुईखेड येथील शेतशिवारातून गौणखनिज खोदून मांजरखेड येथे ट्रकने नेले जात आहे. आज दुपारी गौणखनिज खाली करून परत येत असताना अचानक एलएनकेव्हीच्या वरील विजेच्या तारांना टिप्परचा स्पर्श झाला. भर उन्हात स्पर्श झाल्याने टिप्परने थेट पेट घेतला. ट्रक चालकाने आपला जीव वाचवला. मात्र, ट्रक काही मिनीटांतच जळून खाक झाला. हा ट्रक एनसीसी कंस्ट्रक्शनचा असून राजस्थान राज्यातील आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.