अमरावती :सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात प्रत्येक स्थळ हे पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. चिखलदरा कडे जाताना उंच पहाडावर वसलेले मोथा या गावातील (Motha village near Chikhaldara) आदिवासी आणि गवळी बांधवांना (Tribals and Gawlis) पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून पर्यटकांच्या मनोरंजनाचा व्यवसाय (business of entertaining tourists) हाती गवसला आणि मोथा गावात पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढायला लागली आणि गावातील तरुणांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली. Motha Villagers Business
मोथा येथे पर्यटकांची मौज :विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात तीनही ऋतूंमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठा या गावात बाईक रायडिंग, हॉर्स रायडिंग, घोडा गाडीत स्वार होऊन उंच पहाडाच्या पायथ्याशी फेरफटका, उंटावर स्वार होऊन पहाड आणि दऱ्यांच्या मधात फिरण्याचा घेता येणारा आनंद लुटता येतो आहे. एकूणच चिखलदरा येथे निसर्गाचा आनंद लुटल्यावर किंवा तो लुटण्याआधी मोथा या गावात पर्यटकांना आगळीवेगळी मौज करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे, हे छोटेसे गाव मेळघाटातील पर्यटन केंद्राच्या नकाशावर आले आहे.
तरुणांना मिळतो आहे हजार रुपये रोज :सुमारे 800 लोकसंख्या असणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील मोथा या गावात शेती आणि खव्याची विक्री हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीमध्ये सातत्याने होणारे नुकसान यामुळे या गावातील तरुणांसमोर उदरनिर्वाहासाठी नेमके काय करावे असा प्रश्न पडला होता. पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीने ह्या गावात चार चाकी बाईक आणून चिखलदरा कडे जाणाऱ्या पर्यटकांना हात दाखवून बाईक रायडिंग करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू पर्यटक मोठा आहे ते थांबायला लागले आणि बाईक रायडींग चा आनंद घ्यायला लागले. परतवाडा ते चिखलदरा दरम्यान असणारा उंच घाट हा मोठा येथे संपतो आणि उंच पहाडावर सपाट जमिनीवर हे गाव असल्यामुळे या ठिकाणी लाल मातीत बाईक रायडिंग घोडेस्वारी हे पर्यटकांना आकर्षित करायला लागले.