अमरावती - तुम लिख के देते क्या; हमारी जिम्मेदारी तुम लेते क्या. 'कोई बड़ा अधिकारी आया तो ही हम कोरोना की लस लेंगे' असे एक ना अनेक प्रश्न आहे अतिदुर्गम भाग असलेल्या मेळघाटाच्या छोट्या मोठ्या गावातील आदिवासी बांधवांचे आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणावर लोक लस टोचून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, मेळघाटामध्ये आदिवासी बांधव आजही लस घेण्यासाठी फार इच्छुक नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांची समजूत काढताना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
आधी तुम्हाला, नंतर आम्हाला..! जिवाच्या भीतीने लसीकरणासाठी आदिवासींच्या वेगवेगळ्या अटी - amravati tribal vaccine news
लसीकरणाला गेलेल्या आरोग्य पथकालाच येथील आदिवासी उलटसुलट प्रश्न विचारत आहे .आम्ही लस घेतो परंतु आम्हाला काही झाल्यास, त्याची जबाबदारी कोण घेईल ? तुम्ही आम्हाला लिहून देतात का? जिल्हाधिकारी सारखे वरिष्ठ अधिकारी आले, तरच आम्ही लस घेऊ अशा एक ना अनेक अटी आदिवासी बांधव हे आरोग्य विभागावर समोर ठेवत आहे.
अमरावती
पहिले आरोग्य कर्मचारी नंतर आम्ही लस घेऊ
मेळघाटातील एका गावातील आदिवासी बांधवांनी आरोग्य विभागासमोर एक भलतीच अट घातली. पहिला डोस तुम्ही घ्या त्यानंतर आमच्या गावातील लोक नऊ डोस घेतील. त्यानंतर दुसऱ्या बॉटल मधील एक डोस तुम्ही घ्या. त्यानंतर आमच्या गावातील लोक घेतील अशा प्रकारच्या अनेक अटी सुद्धा आरोग्य विभागासमोर आदिवासी बांधवांनी घातल्या आहे.
मेळघाटातील चार गावात 100% लसीकरण
एकीकडे मेळघाटमध्ये अनेक गावात लसीकरणासंदर्भात लोकांमध्ये गैरसमज आहेत. मात्र, मेळघाटामध्ये चार गावातील 45 वर्षावरील नागरिकांचे 100% लसीकरण केले आहे. यामध्ये चिखलदारा तालुक्यातील टेम्बुरसुना आणि चिंचखेड या गावातील नागरिकांचे 100% लसीकरण झालेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिचखेड येथील सरपंच यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधून त्यांचे कौतुकही केले होते.
हे आहेत आदिवासी बांधवामध्ये गैरसमज
आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहे. आरोग्य विभागाकडून करण्यात येणारे लसीकरण हे जीव घेण्यासाठी केल्या जात असल्याची भीती आदिवासी बांधवांमध्ये आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेली लस आणि आदिवासींना देणारी लसही वेगळी आहे.