अमरावती - जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक नवा उपक्रम राबवण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
अमरावतीत 'एक पेड शहीदो के नाम', वंदे मातरम ग्रुपचा उपक्रम - स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपन
स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपन करून त्याला शहिदाचे नाव देण्याचा स्तुत्य उपक्रम वंदे मातरम समुहाने राबवला आहे.
एक पेड शहीदो के नाम
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील 'वंदे मातरम ग्रुप'कडून स्वातंत्रदिनी वृक्षारोपण करण्यात आले आहे. 'एक पेड शहिदो के नाम' अशा या उपक्रमात प्रत्येक झाडाला हुतात्मा जवानाचे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा हा वेगळा उपक्रम या समुहाने राबवला आहे. शहिदांच्या नावाने झाड जगवून मोठे करण्याचा संकल्प देखील यावेळी वंदे मातरम ग्रुपकडून करण्यात आला आहे.