महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांनी केले वृक्षरोपण, वऱ्हाडी मंडळींना वाटले दोन हजार वृक्ष

विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना कपडे किंवा इतर कोणती भेटवस्तू न देता, वृक्षभेट देण्याचा निर्णय प्रशांत कांबळे व कविता बनसोड या वधू-वरांनी घेतला. या निमित्त त्यांनी आलेल्या पाहुण्यांना दोन हजार वृक्ष भेट दिले. तसेच विवाहबंधनात अडकण्यापुर्वी नवदांपत्यांनी वृक्षारोपण केले.

By

Published : Jul 28, 2019, 12:54 PM IST

Published : Jul 28, 2019, 12:54 PM IST

ETV Bharat / state

अमरावतीत बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांनी केले वृक्षरोपण, वऱ्हाडी मंडळींना वाटले दोन हजार वृक्ष

वृक्षरोपण करतांना वधू-वर

अमरावती - विवाह सोहळा म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा आनंदाचा क्षण. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा अशी प्रत्येक वधू - वराची ईच्छा असते. यात अनेक वधू - वर या लग्न सोहळ्यातून सामाजिक उपक्रम राबवतांना दिसत असतात. असाच एक सामाजिक उपक्रम अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी येथील एका तरुणाने आपल्या विवाहात राबवला आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांनी केले वृक्षरोपण, मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा


वृक्षतोड,अपुऱ्या प्रमाणात वृक्षलागवड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल होत असून पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. या गोष्टीची दखल घेत, विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना कपडे किंवा इतर कोणती भेटवस्तू न देता, वृक्षभेट देण्याचा निर्णय प्रशांत कांबळे व कविता बनसोड या वधू- वरांनी घेतला. या निमित्त त्यांनी आलेल्या पाहुण्यांना दोन हजार वृक्ष भेट दिले. तसेच विवाहबंधनात अडकण्यापुर्वी नवदांपत्यांनी वृक्षारोपण केले.


यावेळी या विवाह सोहळ्याला उपस्थीत काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अरुण अडसड, प्रताप अडसर यांनी देखील वृक्षारोपण केले.

ABOUT THE AUTHOR

...view details