अमरावती- जिल्ह्यातील मेळघाटात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सतत होणाऱ्या पावसामुळे संपूर्ण मेळघाटाचा परिसर हिरवागार झाला आहे. पावसाळ्यातील मेळघाट अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटकांना मेळघाटचे ओलेचिंब सौंदर्य खुणावते आहे. यामुळे पर्यटकांची मेळघाटात गर्दी वाढत आहे.
पावसामुळे मेळघाटाचा परिसर हिरवागार; ओलेचिंब सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी - Kolkas
पावसाळ्यातील मेळघाट अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटकांना मेळघाटचे ओलेचिंब सौंदर्य खुणावते आहे. मेळघाटातील पहाडांवरून अनेक ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत असताना शुक्रवारी झालेल्या पावसामुळे धबधब्यांचा वेग वाढला आहे.
शुक्रवारी सकाळी मेळघाटात पावसाच्या तुरळक सारी बरसल्या, दुपारी 4 नंतर मात्र जोरदार पाऊस कोसळायला लागला. मेळघाटातील पहाडांवरून अनेक ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत असताना शुक्रवारी झालेल्या पावसामुळे धबधब्यांचा वेग वाढला आहे.
पावसामुळे मेळघाटचे सौंदर्य प्रचंड खुलले असून पहाडांवरन वाहणारे धुके, आकाशात अगदी जवळून जात असल्यासारखे भासणारे ढग अशा सुंदर अनुभवाची मौज लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. भर पावसात मेळघाटातील चिखलदरा, कोलकास, सेमाडोह या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.