अमरावती - लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करायला नागरिकांनी बाहेर पडावे. याकरिता निवडणूक आयोगाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येत आहे. अशातच अमरावती शहरातील तृतीय पंथी मतदारांची मतदार संख्या ही ३०० - ३५० असल्याचे तृतीयपंथी यांचे मत आहे.
मतदान हा आपला अधिकार आहे, देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासात प्रत्येक नागरिकाचे मत मौल्यवान आहे. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने केले जात आहे. अमरावतीमध्येही अनेक तृतीय पंथी हे दुकासमोर वाद्य, संगीत व नृत्य करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जो उमेदवार विकास करू शकेल अशा उमेदवाराला निवडून देण्याचे तसेच मतदान करण्याचे आवाहन तृतीयपंथी यांनी केले.