अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे या शहरात 6 जानेवारीला झालेल्या एका महाविद्यालयीन तरुणीच्या हत्येप्रकरणी तरुणीच्या आई-वडिलांनी दत्तापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून सोनवणे यांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.
धामणगाव हत्या प्रकरण : पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी - धामणगाव हत्या प्रकरण
धामणगाव रेल्वे गावात 6 जानेवारी रोजी एका महाविद्यालयीन युवतीची हत्या झाली होती. या घटनेस दत्तापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांच्यामुळेच झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला होता. यावरुन सोनवणे यांची पोलीस ठाण्यातून मुख्यालयात उचलचबांगडी करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे
पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, सोनवणे यांना वरिष्ठांनी मुख्यालयात उचलबांगडी केली असून तरुणीच्या हत्येचा तपास मोर्शीच्या महिला पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. तर, हत्येतील आरोपी सागर तितुरमारे याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
हेही वाचा -धामणगाव हत्या प्रकरण : पोलीस निरीक्षकाची चौकशी करा, पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी