महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tiger In Chikhaldara : चिखलदरामध्ये जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघोबाचे दर्शन - Tourist Vehicle

चिखलदरा येथे जंगल सफारी (Chikhaldara Jungle Safari) दरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन (Tiger Spotted In Chikhaldara) झाले. जवळपास एक मिनिट हा वाघ पर्यटकांच्या वाहनासमोर (Tourist Vehicle) थांबला होता. त्यानंतर तो पुन्हा जंगलात निघून गेला. अनेकांना यावेळी वाघाचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही.

पर्यटकांना वाघाचे दर्शन
पर्यटकांना वाघाचे दर्शन

By

Published : Dec 12, 2021, 10:23 AM IST

अमरावती -मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत (Melghat Tiger Project) येणाऱ्या चिखलदरामध्ये वैराट जंगल सफारी (Chikhaldara Jungle Safari) दरम्यान, शनिवारी एका पट्टेदार वाघोबाने (Tiger Spotted In Chikhaldara) निवांतपणे पर्यटकांना दर्शन दिलं. जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांनीही आपल्या मोबाईल कॅमेरात या वाघाच्या हालचालीना कैद केलं आहे.

चिखलदरामध्ये जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघोबाचे दर्शन

पर्यटकांची गर्दी वाढली

कोरोनाचे निर्बंध हटल्यामूळे आता चिखलदरा व मेळघाटमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अशातच व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जंगली प्राण्यांचे दर्शन होत असल्याने पर्यटक येथे जंगल सफारी करत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघोबाने दर्शन दिले आहे. अशातच आजही काही पर्यटक जंगल सफारी करत असताना एका वाघोबाचे दर्शन पर्यटकांना झाले. डोळ्यासमोर अचानक वाघ दिसल्याने पर्यटकांमध्ये भिती निर्माण झाली होती. जवळपास एक मिनिट पर्यटकांच्या वाहनासमोर थांबल्यानंतर वाघोबा पून्हा आपल्या अधिवासात निघून गेला.

ABOUT THE AUTHOR

...view details