महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना पट्टेदार वाघाचे दर्शन - amravati latest news

टिपेश्वर अभयारण्यात पुन्हा एकदा वाघाने दर्शन दिले आहे. या वाघाला पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद देखील केले आहेत. अशाच प्रकारे आठ दिवसांपूर्वी देखील मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघाचे दर्शन झाले होते.

टिपेश्वर अभयारण्यात वाघाने दर्शन दिले
टिपेश्वर अभयारण्यात वाघाने दर्शन दिले

By

Published : Jan 11, 2021, 9:23 AM IST

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात काही पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान एका पट्टेदार वाघाने दर्शन दिले आहे. सध्या कडाक्याची थंडी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आहे. याच दरम्यान अनेक पर्यटकांना वाघांचे दर्शन होत आहे. अशाच प्रकारे आठ दिवसांपूर्वी देखील मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघाचे दर्शन झाले होते. आता पुन्हा एकदा वाघाने दर्शन दिले आहे. या वाघाला पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद देखील केले आहेत.

पर्यटकांना पट्टेदार वाघाचे दर्शन
शेकडो प्रजातीचे प्राणीमेळघाट व्याघ्र प्रकल्पात शेकडो विविध प्रजातीचे प्राणी आहेत. परंतु नेहमी या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे हे प्राणी मुक्तसंचार करताना क्वचितच पाहायला मिळतात. सध्या कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे वन्यजीव मुक्त संचार करत आहेत.महाराष्ट्रातील हा पहिलाच व्याघ्र प्रकल्पभारतात एकूण 9 अभयारण्यांना 22 फेब्रुवारी 1974 साली व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यात मेळघाटचा समावेश होता. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. या व्याघ्र प्रकल्पात एकूण 35 वाघांचा संचार आहे. मेळघाटमध्ये 6 मे व 7 मे रोजी प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यानुसार, मेळघाटात 17 हजार 185 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यात 35 वाघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 40 बिबटे, 340 अस्वल, 172 रानकुत्रे, तर 752 गवे आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details