महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्यटकांना भुरळ पाडतोय सहस्रकुंड धबधबा

सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी वाहती झाली असून सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांनी भरला आहे.

सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे

By

Published : Aug 1, 2019, 9:36 PM IST

अमरावती - जुलै महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा वाहता झाला आहे. सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे.

सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे
धबधब्याचा अलीकडचा भाग अमरावती जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात, तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यात येतो. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे डोळयाचे पारणे फेडणारा आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. जून आणि जुलै महिन्यात पावसाने अल्प हजेरी लावल्याने पैनगंगा नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा कोरडा पडला होता. मात्र, सलग तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे सहस्रकुंड धबधबा परिसर पर्यटकांनी भरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details