अमरावती -मागील पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वरुड तालुक्यातील घोडदेव धबधबा प्रवाहित झाला आहे. लॉकडाऊन असतानाही अनेक पर्यटक या धबधब्यावर येऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील घोडदेव धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी - अमरावती पाऊस बातमी
अमरावती जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील घोडदेव धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असून कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, बंधारे ओसंडून वाहत आहे. विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून ओळख असलेल्या वरुड तालुक्यातील घोडदेव धबधबा हा प्रवाहित झाला आहे. सातपुडा पर्वतरांगेत पावसाचे आगमन झाले, की हा धबधबा प्रवाहित होतो. त्यामुळे पर्यटकांची येथे गर्दी होते. सोबतच वरुड तालुक्यातील राजुरा बाजार परिसरात नागपूर व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहणारी झुंज नदी ही दुथडी भरून वाहू लागली असल्याने येथेही पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
धबधबा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणतीच पूर्व तयारी न केल्याने परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.