महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mangalprabhat Lodha : मेळघाटात साजरा होणार फगवा महोत्सव ; पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

शासनाच्या वतीने मेळघाटात फगवा महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी (Minister Mangalprabhat Lodha announced) दिली. मेळघाटात पर्यटकांच्या सुविधेसाठी गाईड तयार करण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम देखील राबविला जाणार असल्याचे पर्यटन मंत्री म्हणाले. या महोत्सवासाठी पाच लाख रूपयांचा निधी देण्यात येणार (Phagwa festival in Melghat) आहे.

Mangalprabhat Lodha
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

By

Published : Dec 11, 2022, 11:34 AM IST

अमरावती :मेळघाटातील आदिवासी बांधवांचा होळी हा अतिशय महत्त्वाचा सण असून यावर्षीपासून मेळघाटात फगवा महोत्सवाला प्रारंभ करण्याची घोषणा पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढायांनी अमरावतीत केली. या महोत्सवासाठी पर्यटन विभागातर्फे पाच लक्ष रुपये निधी देण्यात येईल, असे देखील मंगलप्रभात लोढा पत्रकारांशी बोलताना (Mangalprabhat Lodha announced Phagwa festival) म्हणाले.




मेळघाटात महोत्सव :यावर्षी होळीच्या पर्वावर दहा आणि अकरा मार्चला मेळघाटात शासनाच्या वतीने फगवा महोत्सव साजरा केला जाणार (Phagwa festival in Melghat) आहे. रोजगारासाठी मेळघाटच्या बाहेर गेलेले आदिवासी बांधव होळीनिमित्त घरी परततात. होळी हा सर्वात मोठा सण म्हणून आदिवासी बांधव साजरा करीत असताना आता शासनाच्या वतीने देखील आदिवासी बांधवांसोबत दोन दिवस उत्सव साजरा केला जाणार असल्याचे पर्यटन मंत्री (Mangalprabhat Lodha) म्हणाले.

प्रतिक्रिया देताना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा



चिखलदरा महोत्सव होणार :गत अनेक वर्षांपासून रखडलेला चिखलदरा महोत्सव यावर्षी मोठ्या थाटात साजरा केला जाणार, अशी माहिती देखील पर्यटन मंत्री मंगल प्रभातलोढा यांनी (Minister Mangalprabhat Lodha announced) दिली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चिखलदरा महोत्सव साजरा केला जाणार असून यासंदर्भात पर्यटन विभाग नियोजन करीत असल्याची माहिती देखील पर्यटनमंत्र्यांनी दिली.


पर्यटन स्थळांचा विकास :जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचषु गुलाबराव महाराज यांच्या जन्मस्थळासह श्री क्षेत्र कौडण्यपूर ,रिद्धपूर, मुक्तागिरी अशा अनेक पौराणिक धार्मिक महत्त्वाच्या स्थानवर पायाभूत सुविधांचा विकास येत्या तीन महिन्यात केला जाईल, अशी माहिती देखील मंगलप्रसाद लोढा (Tourism Minister Mangalprabhat Lodha) यांनी दिली. मेळघाटात पर्यटकांच्या सुविधेसाठी गाईड तयार करण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम देखील राबविला जाणार असल्याचे पर्यटन मंत्री (Phagwa festival to be celebrated in Melghat ) म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details