अमरावती - कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मेळघाटात वसलेले चिखलदरामधील पर्यटन बंद होते. मात्र, आता १ सप्टेंबरपासून मेळघाटातील पर्यटन पुन्हा सुरू झाले असून, पर्यटकांची रेलचेल हळूहळू सुरू झाली आहे. त्यामुळे येथील लहान-मोठ्या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तब्बल पाच महिन्यानंतर चिखलदऱ्यातील पर्यटन सुरू - चिखलदरा पर्यटन न्यूज
कोरोना आला आणि सर्व पर्यटन बंद झाले. त्यामुळे याठिकाणी असलेल्या लहान-मोठ्या व्यावसिकांना याचा फटका बसला होता. तसेच पर्यटन क्षेत्राला देखील फटका बसला होता. आता सरकारने नवीन गाइडलाइन्स दिल्या आहेत. त्यानुसार १ सप्टेंबरपासून बऱ्याच गोष्टी सुरू होत आहे. त्यातच मेळघाटामधील चिखलदरा येथील पर्यटनाला अटी-शर्ती ठेवून शासनाने परवानगी दिली आहे.
![तब्बल पाच महिन्यानंतर चिखलदऱ्यातील पर्यटन सुरू chikhaldara tourism corona effect on chikhaldara tourism चिखलदरा पर्यटन न्यूज चिखलदरा पर्यटनावर कोरोनाचा परिणाम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8649036-1014-8649036-1599033172609.jpg)
दऱ्या-खोऱ्यात वसलेले मेळघाट हे त्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्यातच इथं असलेला व्याघ्र प्रकल्प त्यात आणखीनच भर घालतो. दरवर्षी लाखो पर्यटक व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना आला आणि सर्व पर्यटन बंद झाले. त्यामुळे याठिकाणी असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला होता. तसेच पर्यटन क्षेत्राला देखील फटका बसला होता.
आता सरकारने नवीन गाइडलाइन्स दिल्या आहेत. त्यानुसार १ सप्टेंबरपासून बऱ्याच गोष्टी सुरू होत आहे. त्यातच मेळघाटामधील चिखलदरा येथील पर्यटनाला अटी-शर्ती ठेवून शासनाने परवानगी दिली आहे. आता पाच महिन्यापासून बंद असलेले सर्वच व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून पर्यटक सुद्धा आता चिखलदरामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.